महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालनं (ED) नोटीस बजावली आहे. 22 ऑगस्टला त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे दबावाचं राजकारण आहे, असं मनसेचं म्हणणं आहे, तर राज ठाकरेंनी याचं राजकीय भांडवल करू नये, अशी भाजपची भूमिका आहे. कोहिनूर मिल खरेदी प्रकरणात राज ठाकरे आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे पूत्र उन्मेष जोशी पार्टनर होते.
0 Comments